भारत सरकार निती आयोग सदस्य व विमुक्त भटक्या आयोगाचे मा.अध्यक्ष दादा इदाते यांची महानायक वसंतरावजी नाईक परसबागेला भेट.*

 

लोकदर्शन नागपूर 👉 प्रा. अशोक डोईफोडे
*==============================*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भटक्या विमुक्तासाठी उभे आयुष्य खर्ची घालणारे कृतिशिल आणि अभ्यासपूर्ण उत्तुंग व्यक्तीमत्व विमुक्त भटक्या आयोगाचे मा. अध्यक्ष आणि भारत सरकारच्या निती आयोगाचे सदस्य दादा इदाते यांची मनिष नगर, नागपूर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा.श्रीपतभाऊ राठोड,सौ.जयश्रीताई श्रीपत राठोड आणि कन्या दिपाली व अंजली राठोड यांच्या परिश्रमातून साकारलेल्या महानायक वसंतराव नाईक परसबागेला भेट देवून समाधान व्यक्त केले. “दिपाली व अंजली माझ्या नातीन आहे, त्यांचे एवढया लहान वयातील कार्य हे खूपच उच्च कोटींचे असून भविष्यात खूप उंच भरारी घ्यावी, स्वतःचे, आईवडीलांचे व देशाचे नाव मोठे करावे.,, असा भरभरून आशीर्वाद दिला.पर्यावरणपूरक, सर्वांसाठी उपयोगी,फायदेशिर व अनुकरणीय यशस्वी प्रयोगाची प्रेरणा सर्वांनी घेवून आरोग्यसंपन्न राष्ट्र निर्मितीसाठी असे उपक्रम राबविण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले.
दादा इदाते यांच्या सोबत समाजासाठी समर्पितपणे अहोरात्र मेहनत घेणारे संघर्ष वाहिनी,नागपूरचे मुख्य संयोजक मुकूंद अडेवार, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सहसचिव व बंजारा कौशल्य व तांडा सुधार सोसायटी (बाटी), नागपूरचे मनोज राठोड यांची उपस्थिती व धडपड विशेष उल्लेखनिय होती, त्याचप्रमाणे राष्ट्रीय विमुक्त घुमंतू विकास परिषदेचे अध्यक्ष किशोर सायगणही सोबत होते. या प्रसंगी सर्वांनीच परसबागेसह दिपाली व अंजली यांचे तोंडभरून कौतुक केले. श्रीपतभाऊ राठोड आणि जयश्रीताई श्रीपत राठोड यांचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. दिपाली व अंजली राठोड यांचे प्रत्यक्ष कृती, प्रयोगातून साकारलेले उत्कृष्ट कार्य व प्रसंशनिय सादरीकरण खरोखरच समाजोपयोगी असून अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविण्याचा मनोदय मुकूंद अडेवार यांनी व्यक्त केला तर याप्रसंगी मनोज राठोड यांनी सुद्धा परसबागेचे कौतुक केले, दिपाली व अंजलीची बौद्धीक क्षमता, वक्तृत्व आणि कृतृत्व पाहून भारावून गेले आणि दोघांच्या कार्याला उच्चस्तरावर नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.
सर्व मान्यवरांचे राठोड परिवाराकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.आरोग्यदायी आयुर्वेदीक काढा घेवून विशेष भेटीची सांगता करण्यात आली.
राठोड परिवाराने अतिशय मेहनत आणि नवंसंकल्पना घेऊन साकारलेली ही पर्यावरणपूरक परसबाग एकदा आवश्य भेट देऊन पाहण्यासारखी आहे.
==================

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *