by : Ajay Gayakwad
वाशिम
गंभीर संकटसमयी आशेचा किरण असतात पोलीस. त्यांची मदत त्वरित मिळणे शक्य होत नाही. मात्र तक्रार करण्याआधीच SP मदतीला धावून आल्याने जखमींवर त्वरित उपचार झाले. घटना अशी, मालेगाव ते शिरपूर रस्त्यावर जंगली प्राणी रोही रस्त्यामध्ये आला असता दोघे गंभीर जखमी होऊन पडले. त्याच मार्गाने निघालेले जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग त्यांना सदर जखमी दिसल्याने त्यांनी त्वरित मदत करून उपचारासाठी पाठविले.
सुनिता मोतीराम गायकवाड (50) , अक्षय मोतीराम गायकवाड (30) रा. अकोला हे दोघे अकोल्यावरून रिसोड कडे दुचाकीने जात असताना मालेगाव ते शिरपूर रस्त्यावर एक जंगली प्राणी रोही रस्त्यामध्ये आला असता त्यांनी अचानक ब्रेक लावला त्यामुळे वाहन पडून दोघेही जखमी झाले.शिरपूरहुन वरून SP बच्चन सिंग वाशिम कडे जात असताना त्यांना रस्त्यावर हा अपघात झालेला दिसला त्यांनी त्वरित त्यांच्या वाहनातून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे पोहचवण्याची तजवीज केली. मालेगाव येथे प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर केले आहे.
जखमींना त्वरित झालेल्या मदती मुळे SP बच्चन सिंग तसेच पोलीस प्रशासनाचे सदर जखमीनी आभार मानले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किरण वानखेडे पोस्ट मालेगाव, पीएसआय राहुल गंधे, पीएसआय गजानन चौधरी रुग्णालयांमध्ये हजर होते.