लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर व स्कॉलर अकॅडमी गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन – 2023 वसंतोत्सवचे आयोजन स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात 23 ते 26 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन 23 जानेवारीला दुपारी 12 वाजता संस्था अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते होणार आहे, मुख्य अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट, गडचांदूरचे युनिट हेड अतुल कन्सल, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड विठ्ठलराव धोटे व गोंडवाना विद्यापीठचे परीक्षा संचालक तथा संस्था संचालक डॉ अनिल चिताडे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष श्यामसुंदर हिरादेवे, राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक विठ्ठलराव थिपे, प्रसाद कळशिकर, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, उज्वलाताई धोटे, पुष्पाताई हिरादेवे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता सांस्कृतिक रजनी लोकनृत्य व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
24 जानेवारी ला सकाळी 9 वाजता प्रश्न मंजुषा,10 वाजता आकाशची आकाशवाणी विद्यार्थ्यांसाठी विनोदी प्रबोधनपर कार्यक्रम होईल. 11 वाजता विदर्भ स्तरीय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. 25 जानेवारीला सकाळी 11 वाजता चमकते सितारे माजी विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. दुपारी 3 वाजता सुप्रसिद्ध सिनेतारका निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहेत.
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड विठ्ठलराव धोटे यांच्या हस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष श्यामसुंदर हिरादेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थी देशभक्तीपर समूहनृत्य सादर करणार आहेत. वसंतोत्सवमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्या स्मिता अनिलराव चिताडे, प्रा. रामकृष्ण पटले व रश्मी भालेराव यांनी केले आहेत.