लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर व सायन्स कॉलेज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन अकॅडमी, चंद्रपूर येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मानवविद्या व वाणिज्य विभागातून प्रा. आशिष देरकर यांच्या शोधनिबंधाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
‘लोकमान्य टिळकांचे कृषी विषयक विचार’ या विषयावर प्रा. आशिष देरकर यांनी शोधनिबंध सादर केला होता. या परिषदेसाठी देशभरातील ७०० संशोधकांनी नोंदणी केली होती. अनेक संशोधकांनी यावेळी पेपर सादरीकरण केले. प्रा. देरकर यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात लोकमान्य टिळकांनी शेतकऱ्यांबाबत मांडलेल्या भूमिका व त्यांनी केसरी वृत्तपत्रामधून शेतकऱ्यांची केलेली जनजागृती आणि त्यांचा विचारांची आजच्या शेतकरी समस्यांशी सांगड घातली आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. एन. एच. खत्री, मुख्य अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एस.एस. कावळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, डॉ. प्रदीप घोरपडे, डॉ. एन.एस. कोकोडे, डॉ. आशिष लांबट, अविनाश आकुलवार, डॉ. एस.बी. कपूर, माझे संशोधन मार्गदर्शक खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे, सायन्स कॉलेज नागपूरचे प्राचार्य डॉ. एम.पी. ढोरे, डॉ. ए.डी. बोबडे, डॉ. प्रवीण तेलखडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.