लोकदर्शन 👉 राहुल खरात
नातेपुते – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेन तर्फे सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्ष व सावित्री जिजाऊ जयंती निमित्त जि. प. प्राथ.चंद्रपूरी पाठशाळेला टी.व्ही.सिरीयल सिने अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांचे शुभहस्ते महापुर्षांचे 150 ग्रंथ नुकतेच भेट दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित सरपंच मा.संताजी बोडरे,ग्रा.सदस्य भगवान जानकर, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष लखन चव्हाण,शाळा समिती अध्यक्ष सौ.साधना चव्हाण,उपाध्यक्ष सौ. सुवर्णा वाघमारे,सौ.गोरे उपस्थित होते.
यावेळी स्वप्ना दुर्वे आपले विचार मांडताना मुलांना म्हणाले की प्रामाणिक पणे जिद्दीने अभ्यास तर कराच सोबत अभिनय आवड असेल तर त्या कडे पण लक्ष ध्या.ग्रामीण भागातील मुली पण या शेत्रात चमकत आहेत,हे सागून प्रत्यक्षात बाळू मामाच्या नावानं चांगभंल ,नवनाथ गाथा या मधील भूमिका साकारून अभिनय कला कशाला म्हणतात हे दाकवून प्रत्येकीच्या मनात स्थान मिळविले. अनेकांनी त्यांचे सोबत फोटो,सेल्फी फोटो काडून आठवण जतन केली. यावेळी ढोक यांनी या शाळेच्या आठवणी सांगत मुलांना अभ्यास करीत एक कला अवगत केली तर आपले ध्येय लवकर गाठता येते सागून भरपूर श्रम करा. तसेच महाराष्ट्र आणि तेलगांना राज्यात सत्यशोधक विवाह लावत असल्यामुळे नावलौकिक मिळाला याची पुण्याई ही शाळा व हाडाचे शिक्षक यांना जाते हे आवरजून सागितले .
याप्रसंगी सामाजिक कार्याबद्दल लखन चव्हाण पती पत्नीचा एकत्रित शाल पांघरून त्यांना फुले दाम्पत्य फोटो फ्रेम देऊन सन्मानित केले तर या शाळेतील मुली खो खो स्पर्धेत जिल्हा पातळीवर गेली म्हणून अभिनेत्री दुर्वे यांचे हस्ते विशेष सन्मान करून सरपंच बोडरे यांनी मुलींना फेटे बाधून शाबासकी दिली.
यावेळी छत्रपती शाहू महाराज, थोरसमाज सुधारक महात्मा फुले,सावित्रीबाई आणि डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला .यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शाळेतील मुले शिक्षक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पाटोळे सर अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक शेलके सर , तर आभार प्रदर्शन अशोक रूपनवर सर ,लखन चव्हाण यांनी मानले.