लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : देशाचा किंवा राज्याचा सर्वांगीण विकास साधत असताना पर्यावरणाचा ऱ्हास आणि सृष्टीचक्राचे असंतुलन ही चिंतनिय बाब असून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राजुरा येथे आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुयोग धस, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अभिनेता जयराज नायर, स्वागताध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, दीपक भंवर, सचिन वाघ, युवा स्वाभीमान पक्षाचे सूरज ठाकरे, वंचित बहुजन महासंघाचे भूषण फुसे, डॉ. राजकुमार खापेकर, लताश्री वडनेरे, सतीश धोटे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बादल बेले, प्रा. डॉ. प्रीती तोटावार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘विमुक्त भटके व बेलदार समाज प्रवाह एक संघर्षाचा’च्या डॉ. तोटावार लिखित ‘निसर्ग आपुला सखा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्घारटनादरम्यान मुनगंटीवार यांचा भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात संविधानाचा संदर्भ देत श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ‘संविधानामध्ये पर्यावरण रक्षणाची मूलभूत जबाबदारी प्रत्येकावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाच्या आयोजनाचे हे पहिले वर्ष आहे. या संमेलनातील चर्चा, विचारमंथन, विचारांच्या आदान-प्रदानातून संपूर्ण विदर्भातून पर्यावरण संवर्धनाचे क्रमांक एकचे काम झाले पाहिजे.’
‘मृत्यू का जब बुरा तांडव मनुष्य के सामने आएगा..क्यो नही बचाए हमने वृक्ष यह सोच मानव पछताएगा..’ हा शेर नमूद करीत मुनगंटीवार यांनी वृक्षतोडीमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल उपस्थितांना सावध केले. आपण लाकुडतोड करून जंगलाचे आणि सोबत पाण्याचेही प्रदूषण करीत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.’ सूरज ना बन पाए तो, दीपक बन के जलता चल..’ असे सांगत त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन केले.
‘जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी । देख तमाशा लकड़ी का ।। क्या जीवन क्या मरण कबीरा । खेल रचाया लकड़ी का ।। जिसपर तेरा जनम हुआ । वो पलंग बना था लकड़ी का ।। माता तुम्हारी लोरी गाए । वो पलना था लकड़ी का ।। पढने चला जब पाठशाला में । लेखन पाठी लकड़ी का ।। गुरु ने जब जब डर दिखलाया । वो डंडा था लकड़ी का ।। जिसमे तेरा ब्याह रचाया । वो मंडप था लकड़ी का ।। वृद्ध हुआ चल नही पाया । लिया सहारा लकडी का ।। डोली पालकी और जनाजा । सबकुछ है ये लकड़ी का ।। जनम-मरण के इस मेले में । है सहारा लकड़ी का ।। उड़ गया पंछी रह गई काया । बिस्तर बिछाया लकड़ी का ।। एक पलक में ख़ाक बनाया । ढ़ेर था सारा लकड़ी ।।’ अशी भावनिक साद घालत त्यांनी पर्यावरण संवर्धन, संतुलनाचे कार्य भव्यदिव्य प्रमाणात व्हावे, असे आवाहन केले.