लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील ए आय एम आय एम कार्यालयात फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ,सर्वप्रथम फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लीम शिक्षिका, ज्या सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेल्या शाळेत सावित्रीमाई सोबत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
त्याकाळी मुलींना शिक्षण देणे हे समाजातील तथाकथित धर्माच्या ठेकेदारांना व उच्चभ्रू लोकांना रुचले नव्हते त्यांनी गोविंदरावांचे कान फुंकून ज्योतीबांना व सावित्रीबाईना घराबाहेर काढायला लावले.
अशा बिकट परिस्थितीत सगळीकडे अंधारून आले असताना मदतीचा हात आला तो..
ज्योतीबांचे मित्र उस्मान शेख यांचा, त्यांनी जोतीबांना आपल्या घरी आणले. एवढेच नाही तर स्वयंपाकासाठी आवश्यक ती भांडी कुंडी दिली. स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या जोतीबाना पुन्हा आपल्या कार्यास नव्याने सुरवात केली……*
ज्योतिबा व सावित्रीमाई यांना महत्वाचा आधार व साथ मिळाली ती उस्मान शेख त्यांची बहीण फातिमा शेख यांची.
सावित्रीमाई आणि फतिमा शेख ह्याच आहेत स्त्री शिक्षणाचे जनक…या प्रसंगी मो.रफिक शेख, व मैमु बेग यांनी मार्गदर्शन केले
गडचांदुर कार्यालयात तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख,शहर अध्यक्ष शेख मुनाफ, मैनू बेग युवा अध्यक्ष ,शेख रऊफ भाई, शेख दस्तगीर,शेख जिब्राईल, शेख युसुफ,सय्यद तोसिफ,शब्बीर शाह इत्यादी पदाधिकारी हजर होते.
,