By : Avinash Poinkar
वणी :
वणी तालुक्यातील उकणी येथील अनिल शंकर कातरकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील ‘थर्मल इंजिनिअरिंग सायन्स’ मध्ये नुकतीच आचार्य पदवी जाहीर झाली आहे. त्रिपुरा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आगरतळा, येथून त्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली. प्रा. डाॅ. स्वपन भोमिक यांच्या मार्गदर्शनात यांत्रिकी अभियांत्रिकीबाबत त्यांनी संशोधन कार्य पुर्ण केले. अनिल कातरकर यांचे त्यांच्या संशोधनादरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २० शोधप्रबंध प्रकाशित झाले असून चार आतंरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे. विशेषता यांत्रिकी अभियांत्रिकीत कातरकर यांच्या नावे तीन पेटंटची नोंद आहे. उकणी सारख्या छोट्याशा गावातून पुढे आलेले अनिल कातरकर यांनी आचार्य पदवी मिळवल्याबाबत त्यांचे आई-वडील, भाऊ अमोल व सुधीर कातरकर, पत्नी काजल कातरकर, मुलगा अयांश कातरकर, मोहन बल्की, अजय पिंगळे, विश्वजित मुजूमदार, किशोर पावडे, प्रकाश पायपरे, कुटुंबिय व परिसरातील मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे. हे यश माझे नसून माझ्या जडणघडणीतील प्रत्येकाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मार्गदर्शन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात संशोधन क्षेत्रात विशेष योगदान देण्याचा कातरकर यांचा मानस आहे.