By : Ajay Gayakwad
वाशिम :
वाशिम तालुक्यातील अनसिंग गाव येथे पाणीपुरवठाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे पाइपलाइन टाकण्यात येत आहे.काम अतिशय वेगाने व सुयोग्य रितीने चालू आहे. परंतु पाइपलाइनच्या कामामुळे एका शेतकऱ्याच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनसिंग येथे असलेल्या डॉ.आश्रुजी चंद्रुजी भुसारी यांचे अनसिंग ते जवळा रोडवर गट नं. ७१ येथे शेत आहे. या शेतामधून पाईपलाइनच काम झालं असून हे काम विना त्यांच्या परवानगीने झालं आहे, असा त्यांचा दावा आहे.संबंधीत कन्नाटदाराने संबंधित विभागाची कोणतीही परवानगी नसताना तसेच त्या शेतकऱ्यांकडून कोणतीही न हरकत वा परवानगी न घेता हे काम करण्यात आले आहे. त्यामध्ये त्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात असलेले कुंपण , क्राॅकेटचा रोड हे पण तोडण्यात आले आहे. कुंपण तोडल्यामुळे गुरे-ढोरांनी आत शिरून त्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यांच्या शेताजवळ ब्लास्टिंग केल्यामुळे त्यांचे शेताला लावलेले लोखंडी ॲंगल देखील तुटला आहे अश्या प्रकारे उभ्या पिकांचे व फळ झाडांचे बरेच नुकसान झालेले आहे, असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्या, असे निवेदन आश्रुजी भुसारी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत अनसिंग ता . जि वाशिम, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना केले आहे. तरी त्यांनी ही बाब लक्षात घेऊन भरपाई द्यावी, अशी विनंती शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.