By : Ajay Gayakwad
वाशिम :
कारंजा : जैन समाजाच्या आस्थेचे केंद्र व जैन संस्कृतीचा संगम असलेल्या पवित्र श्री.सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला केंद्र व झारखंड सरकाने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणुन घोषीत केले. परंतु देशभरात झालेल्या आंदोलनामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला. मात्र आता श्री समेद शिखरजी पवित्र जैन तिर्थक्षेत्र म्हणुन घोषीत करावे. या मागणीसाठी कारंजातील सकल जैन समाज बांधवाच्या वतीने दि. ११ जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयेाजन करण्यात आले आहे. या मोर्चात सकल जैन समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले.
११ जानेवारी रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे कारंजा येथील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, दिंगबर व श्वेतांबर तसेच स्थानकवासी जैन समाजातील पुरूष व महीला, युवा वर्ग (पांढरे शुभ्र कृर्ता, महीलांनी केसरी रंगाच्या साड्या परीधान करून ) उपस्थित राहणार आहे. मोर्चाची सुरवात दि. ११ जानेवारी रोजी सकाळी दिंगबर जैन मंदीर गांधी चौक कारंजा येथून सकाळी ११:०० वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा भगवान महाविर चौ येथून इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक, जयस्तंभ चौक मार्गाने अतिशय शांती, सयंम व शिस्तीने, स्थानिक तहसिल कार्यालय येथे पोहचून निवेदन देणार आहे. मोर्चात सकल जैन बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन एड.संदेश जिंतुरकर, धनंजय राउळ, सतिश भेलांडे, निनाद बन्नोरे, नितीन चढार व श्वेतांबर जैन मंदिरचे अध्यक्ष विजयसेठ लोढाया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कचरूलाल गटागट व सकल जैन बांधवाच्या वतीने करण्यात आले असल्याचे वृत्त संजय कडोळे यांचेकडे प्राप्त झाले आहे.