लोकदर्शन 👉 नितेश केराम
जिवती : श्यामादादा कोलाम यांचे क्रांतिकारी विचार आजच्या युवा पिढीला आदर्श देणारे आहे, त्यांच्या विचारांनी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात युवकांनी पेटून उठावे, बोगस जाती समुह आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे अश्यावेळी श्यामादादा कोलाम यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन पेटून उठावे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले ते तालुक्यातील मौजा पल्लेझरी येथे आयोजित श्यामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होते.
पुढे जुमनाके बोलताना म्हणाले की आदिवासी समाज शिक्षणाच्या दृष्टिकोनातून फार मागास समजला जातो परंतु हा विचार आता बदलणे काळाची गरज आहे समाजातील युवकांनी शिक्षणातून संघर्ष करावा, असेही त्यांनी बोलताना म्हटले आहे.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला श्यामादादा कोलाम यांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली, त्यानंतर श्यामादादा कोलाम संघटनेच्या फलकाचे उदघाटन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष दौलत पा. कोरांगे, यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य नेतुजी जुनघरे, गोंडवाना संग्राम परिषदेचे अध्यक्ष डॉ. निरंजन मसराम, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिवती पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव मेश्राम, गावपाटील भीमराव सिडाम व मोठ्या संख्येने गावकरी तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इसतराव आत्राम, बालाजी आत्राम, भीमराव आत्राम, अप्पू सिडाम, शामराव सलाम, देविदास मेश्राम, भीमराव मेश्राम यांच्यासह गावातील युवकांनी व गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.