लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी
वालूर येथे
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह दरम्यान श्रीमद् भागवत कथा,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे.
(वै.) नथुराम महाराज बाबा केहाळकर वारकरी शिक्षण संस्था,जिंतूरचे ज्ञानेश्वर महाराज मुंढे हे भागवत कथा सांगणार आहेत.शुक्रवार(ता.६) पासून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.शुक्रवार (ता. सहा) दिपक महाराज शास्री(बीड) , शनिवारी(ता.सात) बापूसाहेब महाराज खवणे( ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था,सेलू) रविवारी (ता.आठ) मधूकर महाराज देवगावकर,सोमवारी(ता.नऊ) रमेश महाराज जोगवाडकर,मंगळवारी(ता.दहा) ज्ञानेश्वर महाराज मुंढे बेलखेडकर, बुधवारी (ता.आकरा) पुरूषोत्तम महाराज वालूरकर, गुरुवारी (ता.बारा) जयराम महाराज तांगडे यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे.त्याच बरोबर पहाटे ४ते ६ काकडा भजन,
७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते ३ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा,सायंकाळी ६ते ७ हरिपाठ,रात्री ११ते ४ सकाळी ४ हरीजागर.
शुक्रवारी (ता.१३) सकाळी ११ते १ प्रकाश महाराज साठे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील भाविकांनी भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.