लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 6 जानेवारी ला कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष उद्धव पुरी व प्रा सौ संगीता पुरी यांनी गडचांदूर येथील एका बेरोजगार युवा अभियंता समद शेख यांस स्थायी रोजगार मिळेपर्यंत तात्पुरते उत्पनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी एक संगणक संच ,व्यवसायासाठी मेन रोडवरची दुकानाची खोली , फर्निचरसह भेट देऊन पत्रकार दिन साजरा केला.
स्थानिक विठ्ठल रुख्मिनी देवस्थान येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.ह भ प दिपक महाराज पुरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रा विजय आकनूरवर, जेष्ठ पत्रकार प्रा अशोक डोईफोडे, प्रा डॉ शरद बेलोरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा आशिष देरकर हे लाभले होते.या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर याना आदरांजली वाहून पत्रकारितेचे अनुभव कथन केले. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा विजय आकनूरवर यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी पत्रकार दिपक खेकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून दिपक महाराज पुरी यांनी मागासलेल्या कोरपना व जिवती तालुक्यातील पत्रकारांचे निर्भीड व अविरतपणे चालणाऱ्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या,लोकशाही मध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी केले.संचालन शैलेश लोखंडे तर आभार मारोती चाफले यांनी मानले.
या प्रसंगी उपस्थित पत्रकारांना जिवती पंचायत समितीचे माजी सभापती महेश देवकते व
भाजपचे गडचांदूर शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार यांनी पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमास परिसरातील जेष्ठ महिला , दत्ता पुरी,विठ्ठल पुरी,भगवान गिरी, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
अभियंता समद शेख यांनी व्यवसाय ची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा सौ संगीता पुरी व उद्धव पुरी यांचे आभार मानले.