पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान*

 

लोकदर्शन डोंबिवली 👉 -गुरुनाथ तिरपणकर

डोंबिवली: 6 जानेवारी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचं कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा कडोंमपा डोंबिवली विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षात संपन्न झाला.

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जनजागृतीचे सल्लागार आत्माराम नाटेकर, खजिनदार दत्ता कडुलकर यांच्यासह डोंबिवलीतील पत्रकार उपस्थित होते. संस्थेतर्फे उपस्थित पत्रकारांना सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती आणि पत्रकारांचे या विषयीचे अवलोकन यावर विस्तृत चर्चा झाली. समाजाची नाळ पत्रकारांना ओळखता येते हे आजच्या पत्रकारितेत कितपत साध्य होते यावर साधकबाधक चर्चा झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया बरोबर ब्रेकिंग न्यूज आदी पत्रकारितेतील विविध अंगांमुळे विश्वासार्हतेवर जनता बोटे मोडत असल्याचे दिसून येत आहे काय असा विषय समोर आला. पूर्वी पेपर हातात आला की वाचक प्रथम संपादकीय वाचत असत आता तेही फार दिसून येत नाही. तरीपण आजही गावपातळीवरील पत्रकार शोध पत्रकारिता करून खरी वास्तुस्थिती जनतेसमोर ठेवत आहे ही बाब पत्रकार दिन म्हणून उल्लेखनीय आहे असे काही पत्रकारांनी सांगितले.

दरम्यान पत्रकार दिन निमित्ताने दरपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डोंबिवली पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर जाधव, लोकमतचे पत्रकार प्रशांत माने, सकाळच्या शर्मिला वाळुंज, सामना चे आकाश गायकवाड, पुढारीचे बजरंग वाळुंज, प्रशांत जोशी, मिथिलेश गुप्ता, शरद शहाणे, अंकिता केळकर, रोशनी खोत आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

तसेच महाराष्ट्रातील लेखक, कवी, पोर्टल संपादक, युट्युब चॅनल संचालक, आकाशवाणी केंद्र, स्तंभ लेखक, मुक्त पत्रकार, वृत्तपत्र लेखक, पत्रकार, वृत्तपत्रांचे संपादक यांना ऑनलाईन पध्दतीने “आकर्षक ई-सन्मानपत्र ” पाठवून त्यांचा गौरव करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *