By : Aashish Ragit
कोरपना : नारंडा येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही, अंतर्गत उत्तम कापूस प्रकल्प यांच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय शेतकरी दिवसा’निमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यात जैविक व सेंद्रिय शेती, मृदेचे संरक्षण, माती परीक्षण, सेंद्रिय कर्ब वाढविणे, पाणी व्यवस्थापन, तसेच ठिबक सिंचनाचे महत्व आदी विषयांवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. त्याचसोबत शेती व्यवसायात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरलेल्या नवीन संकल्पनाचे अनुभव कथन यावेळी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश बोर्डे पिपरी, तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून नारंडा येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष ताजने, कृषी विभाग कोरपनाचे कृषी सहाय्यक योगेश केळकर, पोलीस पाटील नरेश परसुटकर आणि पीयू मॅनेजर कामेक्षा ढूमने उपस्थित होत्या. नारंडा, लोणी, पिपरी, माथा, शेरज, आसन आणि वनोजा येथील गट प्रमुख व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते. प्रक्षेत्र अधिकारी संदीप मिटकर, आशिष रागिट, अस्मिता बोंडे, किशोर शेन्डे, दत्ता उपरे आणि विशाल खामनकर यांचा कार्यक्रम आयोजनार्थ विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन संदीप मिटकर, यांनी तर आभार प्रदर्शन किशोर शेंडे यांनी केले.