लोकदर्शन मुंबई-दादर -👉महेश्वर तेटांबे)
मुंबई-दादर
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे जरी खरं असलं तरी वयोपरत्वे ते सेम नसतं..कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची भाषा बदलत जाते. लव्हशिप ही प्रेमकथा ही तशीच शाळेतल्या कोवळ्या प्रेमापासून सुरू होणारी आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी…लव्हशिप या चित्रपटात तुम्हाला प्रत्येक वयाच्या टप्प्यावरच प्रेम अनूभवायला मिळेल म्हणजेच शाळेपासून कॉलेजपर्यंत ते तारुण्यपासून म्हातारपणापर्यंत. प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकत. त्याला वयाची बंधन नसतात पण समाज ते सहसा स्वीकारत नाही. केव्हा केव्हा तर प्रेम इतकं आंधळं असतं की आपण गृहीत धरलेलं प्रेम खोटं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्यावरचा विश्वासच आपण गमावून बसतो. पण कधी कधी प्रेम हे माणसाला जगायलाही शिकवतं. आयुष्याचा शेवट हा आपल्या साथीदारासोबत व्हावा ही इच्छा त्याला जगवते .
कॉलेज मधलं प्रेम हे आपल्या तारुण्यात येणारं अल्लड प्रेम असतं. त्या टप्प्यावर नेमकी प्रेमाची भाषा कळायला सुरुवात होते. कधी आपल्याला आयुष्यभराचा साथीदार मिळतो तरी कधी आयुष्यभर मनात साठवून ठेवणार प्रेम मिळतं. जिथे आपल्या खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. म्हणूनच आपल्याला हवं असणार प्रेम जर मिळालं तर आयुष्य अजून सुखकर होतं. आयुष्यात महत्वाचं असत ते शेवटपर्यंत साथ देणार प्रेम कारण मरण कसही आणि कुठेही येवो पण जेव्हा प्रेम सोबत असतं तेव्हा मरणाचीही भीती उरत नाही. अशा सर्व स्तरावरील प्रेमकथा लव्हशिप या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळतील.
संस्थापक संकेत अनिल ढाणके यांच्या एस डी प्रोजेक्टस् निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अक्षय वास्कर याने केले असून लेखन अविनाश इंगवले, संगीत मंदार पाटील, छायांकन अनमोल चव्हाण आणि संकलन जयदीप माने याने केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील, विपुल साळुंखे, अनुज ठाकूर, श्वेता नाईक, किशोरी मुदूर या दिग्गज कलावंतांच्या संचात लवकरच ओटिटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.