लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रभारी प्राचार्य प्रा.आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन कणॅवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल मुसळे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खडतर जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आज स्त्रिया उच्च शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदावर गेल्या आहेत. परंतु स्त्रियांना शिक्षणाची सुरुवात करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना त्यांनी कधीही विसरू नये, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन कणॅवार तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सविन मडावी, शालिक कांबळे, ननिता बुरान, प्रशांत नवले, संतोष चौधरी, सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.