सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *सन्मानाने जगण्याचे गॅरंटी कार्ड म्हणजे भारतीय संविधान* -प्रा अनिल डहाके

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतिशय खडतर परिस्थितीत केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा ती वाचून साजरी करावी. आज प्रत्येकाला भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे आहे स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,न्याय,संविधानिक नैतिक मूल्य मुलांच्या डोक्यात रुजली पाहिजे कारण या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचं गॅरंटी कार्ड म्हणजे भारतीय संविधान होय.प्रत्येकाला निर्भयपणे जगता आले पाहिजे त्यासाठी संविधानाचे रक्षण केले पाहिजे. इंग्रजी ज्ञान भाषा आहे ती आत्मसात करा असा संदेश प्रा. अनिल डहाके यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक 3 जानेवारी 2022 ते दिनांक 7 जानेवारी 2022 ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ आनंदरावजी अडबाले होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी त्रास सहन केल्याशिवाय आपले आयुष्य घडविता येत नाही त्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे असा संदेश दिला.कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून संस्था सचिव नामदेवरावजी बोबडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या उदघाटनिय भाषणातून माणूस शरीराने थकला तरी विचारांची ताकद कधी कमी होत नसते जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिस्तीचे पालन केले पाहिजे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी प्राअनिल डहाके आणि गणेश शर्मा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी डॉ भूषण मोरे उपस्थित होते .या कार्यक्रम प्रसंगी प्रा. प्रशांत खैरे यांनी त्यांच्या “मला श्वास घेता येत नाही “या कवितासंग्रहाच्या काही प्रती कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक तथा कला विभाग प्रमुख प्रा प्रशांत खैरे यांनी केले तर प्रा दिनकर झाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सोज्वल ताकसांडे, प्रा विजय मुपिडवार ,प्रा अशोक सातारकर ,प्रा जहीर सय्यद ,प्रा अनिल मेहकर ,प्रा दत्तात्रय पोळे ,प्रा सुभाष भगत ,सिताराम पिंपळ शेंडे तथा विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *