*खैरे कुणबी महिला समाज संघटना गडचांदूर च्या अध्यक्षपदी सौ राखी चाफले यांची निवड* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *28 जानेवारीला हळदीकुंकू व स्नेहमिलन* *कर्यक्रमाचे आयोजन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदूर*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खैरे कुणबी समाज संघटना गडचांदूरच्या वतीने दि.2 जानेवारी ला विशेष सभेचे आयोजन समाजबांधव विनायक फुकट यांचे घरी सौ. स्मिताताई चिताडे( प्राचार्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ) यांच्या अध्यक्षतेखाली ,मधुकर . चापले (अध्यक्ष जिल्हा मुख्याधापक संघ चंद्रपूर) ,धर्मराज काळे( प्राचार्य सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर )यांचे प्रमुख उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते .

विखुरलेल्या खैरे कुणबी समाजाला एकसंघ करण्याच्या उद्देशाने व समाजाला संघटनात्मक बळकटी लाभावी यासाठी येत्या 28 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .त्यात मकरसंक्राती निमित्य महिलासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
.कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेकडून नवीन महिला व पुरुष कार्यकारणीची निवळ करण्यात आली . महिला संघटनेच्या अध्यक्षपदी सौ .राखी मारोती चाफले यांची एकमताने निवळ करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.निता संजय कुडे,तर सचिव पदी सौ .आरती रुपेश चुदरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .तर पुरुष संघटनेची जवाबदारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून.सुधाकर बोरकर यांची. तर उपाध्यक्षपदी प्रभारी प्राचार्य नानेश धोटे ,रुपेश रोहने ,सचिव पदी विनायक फुकट ,सहसचिव प्रवीण चणेकर ,दिपक खेकारे तर कार्यकारणी सदस्य मारोती चाफले ,रुपेश चुदरी, संजय बुजाडे ,कृष्णा वायकोर ,सुधीर सातपुते ,यांची निवड करण्यात आली .

सदर सभेला अनिल सातपुते ,तुकाराम धंदरे दिलीप महाजन ,फुकट सर,रुपेश चुदरी,दिलीप महाजन ,योगिता फुकट,वंदना अर्जुनकर व इतर समाज बांधव ,महिला उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *