लोकदर्श 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर सातत्याने सभोवतालच्या गावाच्या विकासाकडे लक्ष देत असते. दरवर्षी गावाची गरज लक्षात घेता व गावांच्या प्रगती साठी वेगवेगळ्या गावां मधे नव-नवीन बांधकामाचे कार्य करीत आहेत
यावर्षी आवारपूर गावातील ग्रामपंचायत व गावकरी यांच्या मागणीला प्राधान्य देत अत्यावश्यक असलेला जिल्हा परिषद शाळा, आवारपूर लगतचा पुल ज्याला पावसाळ्यात दर वर्षी पुर येतो त्याला नविन बनवण्याच्या कार्याचे उद्घाटन अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूरचे युनिट हेड, श्रीराम पी. एस. यांच्या हस्ते दिनांक ०३जानेवारी ला करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतम शर्मा (उपाध्यक्ष- मानव संसाधन) आवारपुर सिमेंट वर्क्स, सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सतीश मिश्रा, प्रतीक वानखेडे, सचिन गोवारदीपे, प्रीतम जक्कनवार व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
या वेळेस गावकऱ्यांनी आवारपुर सिमेंट वर्क्स चे युनिट हेड श्रीराम पी. एस. व उपाध्यक्ष- मानव संसाधन गौतम शर्मा यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलेत व उद्घाटनानंतर सर्व गावकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत. या पुलाच्या बांधकामामुळे पावसाळ्यात लोकांना ये- जा करणाऱ्या त्रासापासून आणि सोबतच बंधाऱ्याचे बांधकाम केल्याने गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केलेत.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. विभागाचे प्रतीक वानखेडे, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे आणि ठेकेदार अरुण रागीट यांनी अथक प्रयत्न केलेत.