लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्तीचे कार्य, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतनिमित्त माळी समाज आणि स्वराज्य आधार फाउंडेशन, राजुरा तर्फे आयोजित समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप, मार्गदर्शक इतिहास अभ्यासक समीर लेनगुरे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलखेडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य नानाजी आदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, समाज सेवक रजनीताई हजारे, जि प माध्यम शाळेचे प्राचार्य किशोर उईके, सौ ज्योतीताई शेंडे, सौ इंदूताई निकोडे, स्वराज आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील मोहूर्ले, सर्व माळी समाज बांधव, स्वराज आधार फाऊंडेशन चे सदस्य आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक प्रणिक्षा वासनिक यांनी केले.