लोकदर्शन नवी मुंबई प्रतिनिधी👉 रुपाली वाघमारे
आरीन फाऊंडेशनने महिलांसाठी दैनंदिन कामाचा ताण कमी करण्यासाठी खास चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ६० महिलांनी आज त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून काही तास स्वतःसाठी काढले. आरीन फाऊंडेशनचे संस्थापक नितेश मिसाळ यांच्या वतीने बुधवारी सानपाडा नवी मुंबई येथील फन स्क्वेअर सिनेमामध्ये भेडिया या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली, सानपाडा, नेरुळ आणि पनवेल परिसरातील महिलानीं या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सानपाडा केंद्रातील सीमा कुरेशी म्हणाल्या, “हा अशा प्रकारचा माझा पहिलाच सहभाग होता. कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, विशेषत: सर्वांचे स्वागत केले. आरीन फाऊंडेशन परिवार या नात्याने आम्ही आयोजन करण्यात योगदान दिलेल्या प्रत्येक सदस्याचे आभार मानते.
रेखा बोरकर म्हणाल्या महिला ग्रुप हे दैनंदिन जीवनात व्यस्त असतात आणि कुठेतरी स्वतः ला वेळ देणे अशक्य होते. म्हणून महिला ग्रुप व स्वयंसेवक ना अमूल्य भेट दिली. ती म्हणजे भेड़िया हा चित्रपट दाखवून सर्वांचा अविस्मरणीय क्षण निर्माण करण्यात आरिन फाऊंडेशन यशस्वी झाले. महिला मध्ये सुद्धा एक नवीन आनंदोल्लास दिसून आला. ‘आरिन फाऊंडेशन’ येणार्या भविष्यात आनंदोल्लास चे उपक्रम राबवित आहेत.आरिन फाऊंडेशन आणि नितेश सर तुमच्यामुळे एवढ्या महिला एकत्र आल्या खूप छान वाटले एक दिवस तेवढंच एन्जॉय. फॅमिली बरोबर जातो पण हा अनुभव वेगळाच असतो.