लोकदर्शन 👉राहुल खरात
अंधश्रध्दा ,कर्मकांड याला तिलांजली देऊन सर्व कार्य पार पाडावीत — सत्यशोधक ढोक
वेळापूर – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती व सत्यशोधक स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 4 था सत्यशोधक पदधतीप्रमाणे प्रा.सत्यशोधक नवनाथ व प्रा.सत्यशोधिका रत्ना माने यांच्या बंगल्याची वास्तूपूजा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पार पाडून बंगल्यास *सत्यशोधक निवास* , धारीवाल कॉम्प्लेक्स,वेळापूर असे अधोरेखित केले. सत्यशोधक पदधतीप्रमाणे वेळापूर परिसरात प्रथमच एका शिक्षकाने महापुर्षांचे विचारणे प्रेरित होऊन कृतीने कार्य पार पाडीत, वर्षाची सुरुवात महामानवांची,समाजसुधारकांची विचारधारा कित्येक शतकानंतर माने मित्रामुळे जिवंत पहायला मिळाली. त्याचप्रमाणे काहींनी स्वर्ग आहे की माहिती नाही परंतु माने सरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सत्यशोधक स्वर्ग वास्तूच्या परिसरात कृतीने पहायला दिले . हे परमभाग्य फुले एज्युकेशन च्या ढोक व माने परिवारामुळे लाभलेच अनेकांनी गौरवउदगार देखील काढले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मारुती यादव आणि अनिल फुले यांचे शुभहस्ते सत्यशोधक नवनाथ व रत्ना माने परिवाराला थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम आणि सत्यशोधक विधी संपन्न केला म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. तर माने परिवाराने 500 मान्यवराना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व गुलाब भेट देऊन नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मारुती यादव यांचे हस्ते छत्रपती शाहू महाराज,अनिल फुले यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तर माने परिवाराचे हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले.
यावेळी सत्यशोधक ढोक यांनी अंधश्रद्धा ,कर्मकांड याला तिलांजली देऊन माने परीवारासारखे सर्व विधी पार पाडावीत असे मौलिक मार्गदर्शन देखील केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पायल गायकवाड , सिद्धी फुले व सृष्टी माने यांनी बहुमोल सहकार्य केले.