लोकदर्शन 👉 राहुल खरात
– जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे . ‘ चालणे ‘ . या क्रिडाप्रकारात गोमेवाडीच्या खेळाडू मुलींची राज्यस्पर्धेसाठी झालेली निवड गावच्या नावलौकिकात भर घालणारी व कौतुकास्पद आहे . असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांनी व्यक्त केले .
सातारा येथे झालेल्या विभागीय क्रिडास्पर्धेत आरती संतोष काळे या मुलीला प्रथम क्रमांक मिळाला . तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . पुजा संतोष काळे या मुलीला तिसरा क्रमांक मिळाला . या जुळया भगिनींनी सुयश संपादन केल्यामुळे त्यांचा व त्यांच्या पालकांचा गोमेवाडी केंद्रातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमेवाडी येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . यावेळी जेष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते सुनील दबडे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकथनकार व गोमेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख जीवन सावंत होते .
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक मोटे , उपाध्यक्ष सोमनाथ झेंडे , सदस्या सविता जवळे , रमाकांत सोहनी, साहेबराव कदम, विमल काळे , परशुराम क्षिरसागर, गणेश कणसे तसेच शिक्षक उपस्थित होते .
यावेळी सुयश संपादन केलेल्या दोन्ही खेळाडू मुलींचा भेट वस्तू व मानाचा फेटा देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच मुलींचे पालक संतोष काळे व कुटुंबियांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला . यावेळी सुनील दबडे व साहेबराव कदम यांनी प्रत्येकी एक हजार रुपये सत्कारमूर्ती खेळाडूंना भेट म्हणून दिले . यावेळी सुधाकर इनामदार, जीवन सावंत , दिपक मोटे , गणेश कणसे, सविता जवळे यांनी मनोगत व्यक्त केले . सुयश संपादन केलेल्या दोन्ही खेळाडू मुली जिल्हा परिषद गोमेवाडी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत . त्या सध्या गजानन हायस्कूलमध्ये शिकत आहेत . यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे गजानन हायस्कूलचे क्रिडाशिक्षक घेरडे सर , मुख्याध्यापक कांबळे सर , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले . सुत्रसंचालन मोटे व आभार कवडे सर यांनी मानले . खेळाडू मुलींनी मिळविलेल्या सुयशाबद्दल त्यांचे गोमेवाडी परिसरातून कौतुक केले जात आहे .