By : Ajay Gayakwad
पातूर
भाजी विक्रेते गोपाल वाघ हे कधीकाळी गल्लीबोळात येऊन भाजी घ्या हो भाजी असे म्हणायचे. गल्लीतील ग्राहकांना साथ घालणारे आवाज आपण ऐकत होतो. मात्र आता ते गोड आवाज हायटेक जमान्यात लुप्त झाले आहेत. प्रत्येक भाजी विक्रीच्या गाडीवर आता इलेक्ट्रॉनिक भोंगा आला आहे. गाड्यावर किती प्रकारच्या भाज्या आहेत व त्याचे दर कितीही सहजरीत्या ते सांगत आहेत. लहान सहान व्यवसाय करताना नवनवीन तंत्रज्ञान वापरून छोटा मोठा व्यवसाय करू लागली. आहे परंपरागत व्यवसायात योग्य ते बदल करून प्रभावीपणे व्यवसाय करणे सुरू झाले आहे. भाजी विक्री करणारे हात गाडी फिरत असताना त्यात काही नवीन भाजी घ्या हो भाजी म्हणून आवाज देऊन घरात बसलेल्या गृहिणींना, नागरिकांना साद घालत भाजी विक्रीसाठी दारात आल्याची चाहूल देत असतात. घरात बसलेले असू द्या, झोपेत असू द्या हा भोंगा ग्राहकाला जागे करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. एखाद्या भाजी विक्रेत्याचा आवाज कमी असेल तर त्यांयावर भोंगा हे प्रभावी साधन ठरले आहे. इलेक्ट्रॉनिक भोंगा दररोज रेकॉर्ड करून ठेवला जातो. तोच आवाज बटन दाबले की नागरिकापर्यंत पोहोचत आहे. गाडी वर किती प्रकारच्या भाज्या आहेत याचे वर्णन आता होऊ लागले आहे. या भोंग्याची किंमत आज 500 रुपये जवळपास आहे.