आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक नितीन आत्राम च्या कुटुंबियांचे सांत्वन : ९ लक्ष ७५ हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण.


लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामगाव येथील शेतकरी कुटंबातील लहन बालक नितीन आत्राम वय ९ वर्षे हा आई- वडीलासह शेतात गेला असता, भूक लागली म्हणून शेतातच्या धुऱ्यवार डब्बा खायला गेला असता अचानक बिबट्याने हल्ला केला, यात हल्ल्यात जागीच ठार झाला होता यामुळे आत्राम कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते. आज आमदार सुभाष धोटे यांनी मृतक नितीन आत्राम यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सानुग्रह निधी अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या ९ लक्ष ७५ रुपयाच्या धनादेशाचे वितरण केले. या प्रसंगी मृतकाची पीडित आई आत्राम, वडील *आनंदराव* आत्राम, यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १० लक्ष रुपयाची मदत सुध्दा लवकरच शासनाकडून मिळणार असल्याची माहिती दिली. काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ३५ हजार रुपयांची मदत केली होती. आ. धोटे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांवर वन्यजीव प्राणी हल्ले करून नुकसान करणार नाहीत यासाठी ठोस व आवश्यक पावले उचलावीत अशा सुचना केल्यात.
या प्रसंगी सहायक वन संरक्षक एस एस पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, बेलगाव च्या सरपंच विनोद जुमनके, उपसरपंच बंडू तोडासे ,वनसडी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी , माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे, प सं उपसभापती संभा पा. कोवे, सरपंच खिर्डी श्याम सलाम, उपसरपंच दीपक खेकारे, उपसरपंच वडगाव सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, रोशन अस्वले, माजी सरपंच खिर्डी आनंदराव पाटील सलाम माजी सरपंच विठ्ठल पाटील गोहने ज्येष्ठ नागरिक शुभकात शेरकी, राजू सलाम, मारोती उरकुडे , चिनू येडमे, गाव पाटील सायकाटी विकास सायकाटी नानाजी निजामुद्दी प्रदीप मालेकर, सिदाम मोतीराम परचाके गोसाई तोडासे, मोतीराम परसाके, गोसावी विमल कुडमेथे, कांताबाई धुर्वे पार्वताबाई मडावी लक्ष्मण पेंदोर, अशोक आस्कर, भास्कर तुराणकर, रमाकांत परसुटकर, शामाकांत निखाडे, रामदास किनाके, वन कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *