लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आजच्या धावपळीच्या युगात रस्ता अपघात व नव-नवीन आजारां मुळे रक्त पुरवठ्याची गरज वाढत चालली आहे. रक्त पुरवठ्याची कमतरता भासू नये व सामोरील व्यक्तीला जीवनदान मिळावे हा मुख्य उद्देश लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने प्रत्येक वर्षा प्रमाने या वर्षी सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रक्त केंद्र विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९.१२.२०२२ ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ए. सी.डब्ल्यू स्पोर्ट क्लब, आवारपूर सिमेंट वर्क्स येथे केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी, राजुरा यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. श्रीराम पी.एस., युनिट हेड, आवारपूर सिमेंट वर्क्स यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गौतम शर्मा, उपाध्यक्ष (मा.सं.), श्री. संदीप देशमुख, टेक्निकल हेड, कर्नल दीपक डे, (एच.ओ.डी)., विपुल घायवटे (एच.ओ.डी.), साईनाथ बुच्चे व शिवचंद्र काळे (युनियन लिडर), मेघा पेंदोर (सरपंच नांदा), पुरूषोत्तम आस्वले (उपसरपंच नांदा), प्रियंका दिवे (सरपंच आवारपूर), बाळकृष्ण काकडे (उपसरपंच, आवारपुर), सुनीता तुमराम (सरपंच हिरापूर), अरुण रागीट (सरपंच बाखर्डी), रत्नाकर चटप, रवी बंडीवार, सतीश मिश्रा, किरण करमरकर, प्रतीक वानखेडे, अजय वैशिष्ट, सचीन गोवारदीपे, युवराज हरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्री. संपत खलाटे उपविभागीय अधिकारी, राजुरा यांनी सी.एस.आर. च्या विविध कार्याची स्तुती केली व लोकांनी जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा केलेत तर अध्यक्ष श्री. श्रीराम पी.एस. यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत रक्तदान शिबिर सुरू करण्यास परवानगी दिली.
या रक्तदान शिबिरात एकूण २०५ लोकांनी स्वइच्छेने रक्तदान केलेत, त्यात महिलांचा, युवकांचा, कॉलनी रहिवासी व गावकऱ्यांचा सहभाग होता. प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, सोबतच त्यांना चहा-नाश्ता व पौष्टिक आहार सुद्धा देण्यात आला.
या रक्तदान शिबिरांना यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. प्रमुख प्रतीक वानखेडे, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे आणि शासकीय वैध्यकीय महाविद्यालयातील, रक्त केंद्र विभागाच्या संघानी श्री. पंकज पवार यांच्या नेतृत्वात अथक प्रयत्न केलेत.
,,फोटो,,