By : Shankar Tadas
#jamgaonExclusiveReport #Chandrapur #leopardattack #Korpanawansadiforest
कोरपना तालुक्यातील जामगाव येथील एका नव वर्षीय मुलाला 25 डिसेंबर रोजी बिबट्याने अर्धा किलोमीटर ओढत नेऊन त्याला ठार केले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. 30 डिसेंबर रोजी पुन्हा एका महिलेला सायंकाळी 5 वाजता शेतामध्ये बिबट आढळून आला. ती घाबरून मारोशीवर चढली त्यामुळे तिचे प्राण वाचले. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून मागील चार दिवसापासून त्याच्यावर सीसीटीव्ही च्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सदर बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्याचे दिसून आले. मात्र त्याने पिंजऱ्यात प्रवेश केला नाही. परिसरातील लोकांना वनविभागाचे कर्मचारी सावध करत असून अनर्थ टाळण्यासाठी विविध उपाय केले जात आहे.
****
सविस्तर पहा