By : Ajay Gayakwad
अकोला :
मणारखेड येथील शेतशिवारात अजगराने शेळीला विळखा घालून तिचा जीव घेतला. त्यामुळे एकच आरडाओरड सुरू झाली. अशावेळी पारस येथील वन्यजीव संस्थेची एक सर्पमैत्रीण धावून आल्याने सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला.
शेळीला गुंडाळून असलेला प्रचंड अजगर पाहून शेतकरी त्याला मारण्याकरिता तिथं आले. पण एवढा विशालकाय साप पाहून त्यांनी माघार घेतली. अखेर त्यातील एकानी वन्यजीव संस्थेच्या सदस्यांना संपर्क केला.
वन्यजीव संस्थाच्या सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे यांनी लगेच घटनास्थळ गाठले पण अजगर लोकांच्या ओरडण्याने झुडपात दळून बसलेला होता.
प्रतिभा ठाकरे यांनी खूप प्रयत्न करून या सापास पकडले. या सापा बद्दल सविस्तर माहिती ही वन विभाग अकोला इथे देण्यात आली. त्या सापाला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
त्या वेळी वन विभागाचे अधिकारी आर ओ ओवे ,आर एफ ओ इंगळे ,मानद वन्यजीव रक्षक बाळ काळाने आदी उपस्थित होते. या सापाला वन विभागच्या अधिकारी यांनी काटेपूरना अभियारण्यात मुक्त केले.