लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि .राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा एस सी आर टी पुणे यांच्यामार्फत दरवर्षी घेतली जाते यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके आपापल्या शाळेमध्ये राबवलेले वैविध्यपूर्ण नवोपक्रम सादर करत असतात. यावर्षी देखील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल(डायट)याठिकाणी प्राचार्य डॉक्टर सुभाष महाजन या विभागाचे प्रमुख माननीय अधिव्याख्याते संतोष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये पहिली फेरी संपन्न झाली. सहभागी स्पर्धकांनी राज्यस्तरीय ऑनलाईन लिंक भरून सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये एकूण प्राथमिक गटातून आठ स्पर्धकांची निवड करण्यात आली व माध्यमिक गटातून दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्या सर्वांचे दुसऱ्या फेरीसाठी जिल्हास्तरावर डायट पनवेल येथे सादरीकरण घेण्यात आले.या सादरीकरणात उरण तालुक्यातील तीन शिक्षकांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली होती. सादरीकरणानंतर या तिन्ही शिक्षकांची पहिल्या पाच मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्राथमिक गट
द्वितीय क्रमांक- कौशिक ठाकूर-उरण गट रा.जि.प.शाळा सारडे,उत्तेजनार्थ – संजय जयराम होळकर -उरण गट रा.जि.प.शाळा मोठीजुई,
उत्तेजनार्थ – श्रीम चैताली किरण म्हात्रे -उरण गट रा.जि.प. शाळा चिरनेर असे असून
या सादरीकरणाचे परीक्षण अधिव्याख्याते लठ्ठे सर, अधिव्याख्याते रामदासजी टोने,पाटील मॅडम (अध्यापनाचार्य विसपुते कॉलेज पनवेल)यांनी परीक्षण केले बक्षिस वितरण कार्यक्रमांमध्ये सर्व सहभागी व प्रथम पाच क्रमांक आलेल्या शिक्षक बंधू-भगिनींना गुलाबपुष्प व सन्मानपत्र तर पहिल्या तीन क्रमांक प्राप्त शिक्षक बंधू भगिनींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्राचार्य सुभाष महाजन, संतोष दौंड ,श्रीमती राठोड , लठ्ठे , रामदास टोणे , संजय गवारी व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. उरण तालुक्यातून सादरीकरण केलेल्या तिन्ही शिक्षकांवर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे ,सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व सर्व शिक्षक, कर्मचारी वर्गाच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.