By : Shankar Tadas
गडचांदूर :
देशात महिला व तरुणीना त्रास देण्याची कुप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही शहरी भागात अशा प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा नाराधमांना पोलिसांचा किंवा येथील न्यायव्यवस्थेचा धाक नसल्याचे दिसून येते. एखाद्या विद्यार्थिनीवर असा प्रसंग आलाच तर वेळेवर कोणीही मदतीला धावून येत नाही. म्हणून गडचांदूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात करण्यात आली आहे.
महिला तथा शालेय विद्यार्थीनिंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, गडचांदूर येथील शाळा, कॉलेज, संविधान चौक, बस स्टॉप परिसर, वीर बाबुराव शेडमाके चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशन गडचांदूर येथे निवेदन देऊन या गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे , सौ. रंजना मडावी, सौ. सपना सेलोकर, सौ.शीतल धोटे उपस्थित होत्या.
****
लोकदर्शन : शंकर तडस : 9850232854