व्हॉईस ऑफ मीडिया’च्याशिरूर तालुकाध्यक्षपदी अशोक शिंदेंची नियुक्ती* *‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची शिरूर तालुका कार्यकारिणी जाहीर*

 

लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात

दि.28 : देशातील वीस मोठ्या संपादकांनी मिळून तयार केलेली व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची शिरूर (जि.बीड) तालुका कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हा अध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषीत करण्यात आली आहे. त्यानुसार शिरूर तालुकाध्यक्षपदी येथील तरूण पत्रकार अशोक रामेश्वर शिंदे यांची तर तालुका कार्याध्यक्षपदी रामेश्वर क्षीरसागळाले यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, राज्य कार्याध्यक्ष संजय आवटे हे आहेत. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न, पत्रकारांचे घर, पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आदींवर ही संघटना प्रामुख्याने काम करणार आहे. देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झालेला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेशी जोडले गेले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागांपर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून आज शिरूर तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून अशोक शिंदे, कार्याध्यक्ष रामेश्वर क्षिरसागळाले, उपाध्यक्ष राज कातखडे, उपाध्यक्ष डिंगाबर गायकवाड, सरचिटणीस प्रमोद निकम, सहसरचिटणीस प्रकाश साळवे, खजिनदार/कोषाध्यक्ष वसुदेव शिंदे, कार्यवाहक गौतम औसरमल, संघटक गोकूळ सानप, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बाफना, सदस्य म्हणून बाळकृष्ण मंगरुळकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बीड जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, उपाध्यक्ष अमोल जाधव, भागवत जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस सुनील यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे, सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here