तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात नखाते आश्रम शाळा प्रथम

 

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा तालुकास्तरीय विज्ञान प्रर्दशनात प्रथम क्रमांक आला असून जिल्हा स्तरीय विज्ञान प्रर्दशनासाठी निवड झाली आहे.27 डिसेंबर मंगळवार रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलुच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रर्दशन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रर्दशनात श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही वैष्णवी इबितवार व मनिषा पवार यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांची जिल्ह्यास्तरीय विज्ञान प्रर्दशनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल वाल्मिकी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलभाऊ नखाते, सचिव भावनाताई नखाते, संचालक तथा जिल्हा बाँक्स लगंडि असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नखाते,समाज कल्याण आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे, समाज कल्याण निरीक्षक तुकाराम भरड, प्राचार्य आर.व्हि.नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, उपमुख्याध्यापक जि.पि.केंद्रे ,प्रयोग मार्गदर्शक सतिष साबळे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here