वरोरा येथील रोगनिदान शिबिरात 831 नागरिकांची तपासणी

By : Shankar Tadas
वरोरा :
श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त 26 डिसेंबर रोजी वरोरा येथे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत “भव्य हृदय रोग व सर्व रोग निदान व तपासणी शिबीर” आयोजित करण्यात आले. संस्थेद्वारे या वर्षातील हे चौथे शिबीर. या शिबीरात 831 नागरीकांनी लाभ घेत मोफत तपासणी करून मोफत औषधी वितरीत करण्यात आली. ट्रस्टचे उपक्रम “विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज जनजागृती अभियान” अंतर्गत जागतिक एड्स दिनानिमिती आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या जिजामात नर्सिंग काॅलेजच्या 17 विद्यार्थीचा जगन्नाथ बाबा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले, सोबतच 2 दुर्धर आजारानी पिडीत व्यक्ती उर्मीला बावणे व अजय कुटेमाटे यांना आर्थिक सहकार्य चेकद्वारे करण्यात आले सोबतच 5 दिव्यांग व्यक्तीना तिनचाकी सायकलचे शिबीरात वितरण करण्यात आले. सोबतच मागील तिन शिबाराती पुढील उपचार व शस्त्रक्रिये करण्यात आलेल्या रूग्णाचे उपचाराचे देयक रक्कम मा. डाॅ विजयजी पोळ यांच्या हस्ते धनादेशाद्वारे श्री शिंगणे, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रूग्णालय सावंगी मेघे वर्धा यांना प्रदान करण्यात आली.
शिबीरास उद्धाटक श्री आयुषजी नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, अध्यक्ष म्हणून श्री मोरेश्वर टेमुर्डे, प्रमुख पाहूणे श्री थुटे, श्री सुधाकर कडू, डाॅ. विजयजी पोळ, श्री रमेश राजूरकर, श्री अहेतेश्याम अली, श्री करण देवतळे सौ. अषलेशा भोयर ईतर प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थीत होते. सर्व मान्यवरांचे श्रध्देय बाबा आमटे स्मृतीचिन्ह व पुस्तक देवून स्वागत करण्यात आले.
शिबीराच्या सफलतेसाठी कार्य केलेल्या माझ्या समस्त मित्र बांधवाचे आयोजकांनी आभार मानले आहे.

****

लोकदर्शन : संपादक

शंकर तडस : 9850232854

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *