लोकदर्शन (पवनी )👉🏻अशोक गिरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समुद्रपुर जिल्हा वर्धा येथे आयोजित केलेल्या विभागीय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत पवनी तालुक्यातील विकास हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील१४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी वेदांत रघुते वर्ग ७ वा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
वेदांत रघुते चे विजयाबद्दल संस्था सचिव अशोक माथुरकर, अध्यक्ष धनराज मुंडले, उपाध्यक्ष पुरुषोत्तम काटेखाये, मुख्याध्यापक संजय गभणे, उपमुख्याध्यापक सुनील कावळे, क्रीडा शिक्षक यशवंत कावळे, उल्हास आडे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.