By : Shweta Patil
चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.बालमजुरी, बालभिकारी, बालविवाह, बालशोषण ही संघटना गेली १० वर्षांपासून काम करतो,बालकांचे बालपण वाचले पाहिजे ह्यासाठी पण काम करतो.
‘ बचपन बचाओ मानवता बचाओ’ ही मोहीम गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे.३ ऱ्या वर्ष पूर्ण होऊन च्या निमित्ताने ‘बालभिकारी मुक्त भारत’ झाला पाहिजे ह्यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सलोनी ताई तोडकरी ह्यांनी ३ दिवसाचे उपोषण केले,बालकाचे अधिकार त्याना मिळाले पाहिजे ह्यासाठी संघटने च्या अध्यक्ष आणि संपूर्ण team उपोषणाच्या माध्यमातून जनजागृती करत होते असे संघटनेचे राज्य संघटक हर्ष तेलुरे ह्यांनी मत व्यक्त केले.
सलोनी ताई ला पाठींबा म्हणून काही कार्यकर्ते त्यामध्ये संघटनेची सदस्य सोनल पाल, संघटनेचे वस्ती संघटक यश शेट्ये,संघटनेच्या राज्याध्यक्ष नेहा भोसले,ठाणे जिल्हा अध्यक्ष अदिती बिराडे,राष्ट्रीय सह संघटक गौरव अडागळे,संघटनेची सचिव श्वेता पाटील,राष्ट्रीय कार्यवाह राहुल भाट, राष्ट्रीय प्रवक्ता अनिकेत पाटील,राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल बनसोडे त्याचबरोबर मैत्रकूल च्या हितचिंतक आरती ताई लोखंडे आणि वंदना ताई ह्यांनी सुद्धा सलोनी आणि मोहिमेला पाठिंबा म्हणून एक दिवसा चे उपोषण केले होते,असे राज्यकार्यवाह ऐश्वर्या तोडकरी ह्यांनी मत व्यक्त केले.
त्याचबरोबर उपोषणाची सुरुवात करण्यासाठी आरती ताई लोखंडे आणि वंदना ताई ह्यांनी उपोषणाची सुरुवात केली आणि ह्या ताई दोन्ही ताई ने आपल्या मोहिमेला पाठींबा देत त्याचे सुद्धा गेल्या २५ वर्षांपासून काम आहे असे सांगत आम्ही सुद्धा आदिवासी आणि वीटभट्टी च्या मुलासाठी काम करतो असे त्यानी सांगितले त्याचबरोबर मैत्रकूल चे प्रमुख संचालक आशिष दादा गायकवाड आणि राज्यकार्यवाह आरती ताई गुप्ता ह्यांनी उपोषणाची सुरुवात केली.लोनाड वस्तीतील आदिवासी मुलाना मैत्रकूल मध्ये आणून त्याचे खेळ आणि गाण्याच्या माध्यमातून त्याच्या पर्यत संघटना आणि मोहीम पोहचवली आणि त्या मुलाना वह्या आणि पेन चे वाटप सुद्धा केले असे कार्यक्रम प्रमुख प्रगती कांबळे ह्यांनी मत व्यक्त केले.
उपोषणाची सांगता करण्यासाठी वी. वी. न्यूज रिपोर्टर यशोधरा ताई हे उपस्थित होते त्यांनी सलोनी ला पाठींबा देत इथे दुसरी सावित्री उभी राहते असे त्या म्हणाल्या,पूजा ताई गणाई, विलास दादा जगताप, फ्रेंड्स फाऊंडेशन चे संस्थापक जितेंद्र दादा दरेकर ह्याची पूर्ण team आली होती आणि त्यांनी सळोनी चा सत्कार एक तुळस देऊन केली त्याचबरोबर मैत्रकूल प्रमुख संचालक आशिष दादा गायकवाड,छात्रशक्ती संस्थेच्या सचिव ह्यांनी सुद्धा उपोषणाची सांगता केली त्याचबरोबर मैत्रकूल चे हितचिंतक संतोष दादा आणि भाजप चे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष निखिल दादा चव्हाण ह्यांनी सलोनी ताई चे उपोषण सोडवले, त्याचबरोबर विद्यार्थी भारती संघटना, कडापे कडापे युवा प्रतिष्ठान,फ्रेडस फाऊंडेशन ह्यांनी आपल्याला पाठींबा पत्रक देऊन आपल्या मोहिमेला पाठींबा असे राज्य सोशल मीडिया प्रमुख ह्यांनी मत व्यक्त केले.