एक
लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 27 डिसेंबर नवी मुंबई मधील कोपरखैरणे येथे ज्ञानविकास संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आगरी समाजाचे 19 वे आगरी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व मानवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या संमेलनाचे उदघाटन जी पी पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांच्या हस्ते झाले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी 29 गाव संघर्ष समितीचे नवी मुंबई अध्यक्ष तथा लोकनेते दि. बा. पाटील नामकरण चळवळीत कार्यशील असणारे सामाजिक कार्यकर्ते दिपक. ह.पाटील (घणसोली) यांना सामाजिक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अँड. पी. सी. पाटील, कार्याध्यक्ष-दशरथ पाटील, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, आगरी साहित्य विकास मंडळाचे संस्थापक मोहन भोईर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डी.डी घरत,संमेलन कार्यवाह अँड प्रसाद पाटील,दशरथ भगत,रविशेठ पाटील, चंद्रकांत पाटील, पुंडलिक म्हात्रे, चंद्रकांत मढवी, संदिप पाटील,रामनाथ म्हात्रे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्थानिक भूमीपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी, स्थानिक भूमीपुत्रांसाठी अर्पण केलेल्या दिपक. ह. पाटील यांना सामाजिक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.