राज्यस्त्यावरील११ के.व्ही.वीजजोडणी धोकादायक….

लोकदर्शन वालूर.👉 महादेव गिरी

वालूर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून केमापूर व पिंपळगाव (गोसावी) परीसरासाठी नविन ११ के.व्ही. वीजपुरवठा जोडणीसाठीचे खांब ऐन वालूर-चारठाणा या रस्त्यालगत उभे केल्याने वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत असून रस्त्यालगतचे विजेचे खांब हटविण्याची मागणी महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे करण्यात आली.
मानवतरोड-वालूर- चारठाणा हा राज्यरस्ता नेहमी वर्दीळीचा असून या रस्त्यावरून केमापूर व पिंपळगाव परीसरात ११ के.व्ही.वीजपुरवठा करण्यासाठी नविन जोडणी करण्यात आली.
संबंधित कंत्राटदाराने विद्युत खांब रस्त्यालगतच उभे करून विद्युत तारा जोडून वीजपुरवठा सुरू करण्याची घाई केली.परंतु या खांबाचा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना वाहनांना अडचणीचे ठरत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाड्या रस्त्यावरील खांबाना अडकून पडत आहेत.
रस्त्यालगत असलेले विजेचे खांब तात्काळ हटवावेत अशी मागणी महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे नागरिका,वाहनचालक यांनी केली आहे.
सरपंच संजय साडेगावकर, गणेश मुंढे यांच्याकसह नागरिक,शेतकरी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here