लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था SEDI उपरवाही येथे नाबार्ड पुरस्कृत अल्प कालावधीचे विविध व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहेत त्यापैकी वेल्डर या व्यवसायातील प्रशिक्षण पूर्ण करून गडचांदूर येथील दोन महिला नाहेदा शहा व फरहाना शेख यांनी निर्माण केलेल्या स्टील फेब्रिकेशन या उद्योगाकरिता नाबार्ड तर्फे दिनांक 15 डिसेंबरला सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री तृणाल फुलझेले, संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद खडसे, प्रोग्राम मॅनेजर श्री श्रीकांत कुंभारे, श्री नरेश सुभे व बँक ऑफ इंडिया उपरवाहीचे व्यवस्थापक दीपक रतने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
गडचांदूर येथील या दोन महिलांनी सुरू केलेल्या स्टील फेब्रिकेशन कामाची प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणी केली व त्यांनी सुरू केलेला हा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांनी निर्माण केलेले उद्योग हे आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे असे मत नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री तृणाल फुलझले यांनी याप्रसंगी व्यक्त केले नाबार्ड आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या उपक्रमामुळे आणि भेटीमुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
अल्प कालावधी कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योगासाठी तयार होत असलेले युवक आणि युवती हे समाजाला प्रेरणा देणारे आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे मत संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद खडसे यांनी व्यक्त केले नाबार्ड व संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाकरिता संस्थेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांच्यामार्फत प्रशंशा व्यक्त होत आहे
या दोन महिला प्रशिक्षणार्थींनी आपल्या या यशा करिता नाबार्ड व अंबुजा सिमेंट फाउंडेशला धन्यवाद दिलेत व तसेच त्यांचे प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री धर्मेंद्र बेलोरकर, प्राचार्य श्री प्रमोद खडसे, कार्यक्रम व्यवस्थापक श्री श्रीकांत कुंभारे, श्री नरेश सुभे श्री रवी मळावी यांचे आभार मानून जास्तीत जास्त युवकांनी व युवतीने अशा योजनांचा आणि सुविधांचा लाभ घेऊन जीवन विकासाचे मार्ग निवडावे असे आव्हान केले