लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांसह अन्य सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जुन्या पेन्शनयोजनेसह, उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी गोंडवाना यंग टीचर्स या वतीने निवेदन विविध कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवलणकर यांना आज नागपूर येथे निवेदन दिले आहे आणि जुनी पेन्शन संघर्ष यात्रेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असून या प्रश्नाकडे शासन लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी ही जुनी पेन्शन संघर्ष यात्रा 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ही भव्य पेन्शन संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे.ज्या बांधवांना पेन्शन नाकारली जात आहे अश्या कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित व मूलभूत हक्काच्या मागणीस न्याय देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ने आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक यांना 2005 नंतर नियुक्त सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पेन्शन ध्यावी या संदर्भात निवेदन दिले आहे .
यावेळी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य प्रा.डॉ. संजय गोरे, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र मुद्दमवार, डॉ.रवी धारपवार , प्रा.अनिल थेरकर, प्रा.मस्की व उपस्थित शिष्टमंडळाने दिले आहे.