By : Ajay Gayakwad
वाशिम
अजय गायकवाड
मालेगांव : 25 डिसेंबर
मालेगांव शहरातील नागरिकांनी ठाणेदार किरण वानखेडे यांची भेट घेऊन शहरातील एका रोड रोमियो च्या त्रासाबद्दल व त्यांच्याकडून खोट्या केसेस करण्याच्या धमक्या बाबत माहिती दिली होती. ठाणेदारांनी याबाबत शहानिशा करून खात्री झाल्यावर
सदर रोड रोमियो वर त्यांच्या विशिष्ट शैलीत कार्यवाही करून नागरिकांची त्याच्या त्रासापासून मुक्तता केली आहे. सदर कार्यवाही मूळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही नागरिकांनी ठाणेदार किरण वानखेडे यांची भेट घेऊन त्यांचे समोर एका रोड रोमियो चे कारनामे विशद केले होते. याबाबतीत आपल्या सहकाऱ्यांना शहानिशा करण्याचे निर्देश ठाणेदारांनी दिले होते. पोलिसांनी परिसरातील नागरिक काही दवाखाने व दुकानात काम करणाऱ्या मुलींना भेटून त्यांना सदर रोड रोमियो पासुन होणाऱ्या त्रासाची इत्यंभूत माहिती मिळवली. पोलिस यंत्रणा सदर रोड रोमियो वर पाळत ठेवून होती. नागरिकांनी सांगितल्या प्रमाणे सदर रोड रोमियो पासुन काही मुलींना होणारा त्रास यामुळे उघडकीस येताच काल 24 डिसेंबर रोजी ठाणेदार किरण वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी गव्हाणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवि सैबेवार पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास कोकाटे, गजानन झगरे, प्रशांत वाढणकर पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, नायब पोलिस कांस्टेबल सुधिर सोळंके आदींनी सदर रोड रोमियो ला पोलिसी खाक्या दाखविला. सदर रोड रोमियो वर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येवून पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे कडे प्रकरण पाठविण्यात आले आहे. मालेगांव पोलिसांनी केलेल्या या कार्यवाही मूळे शहरातील रोड रोमियोंचे धाबे दणाणले असून शहरातील नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. यापुढेही चिडिमारांवर अशीच कार्यवाही करण्याचे संकेत ठाणेदार किरण वानखेडे यांनी दिले असून त्याकरिता अशा रोड रोमियों च्या त्रासाबद्दल माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.