गर्भवतीची विहिरीत उडी, तिथेच झाली प्रसूती

By : Shankar Tadas
चंद्रपूर :
गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेतली असता तिथेच प्रसूती होऊन मुलीला जन्म दिला. मात्र यात दोघींनाही प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना भद्रावती तालुक्यात उघडकीस आली आहे.
सुमठाणा येथील निकिता ठेंगणे या गर्भवती महिलेने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्या नंतर पाण्यात प्राणांतिक वेदनेने ती तडफडत असतानाच पाण्यातच तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र पाण्यात बुडाल्याने महिलेचा व नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भद्रावती पोलिसांनी घटनास्थळ गाठले व शनिवारी रात्री उशिरापर्यंत विहिरीतून महिलेचे शव काढण्यात आले. निकिता हिला पहिला मुलगा झाला होता. मात्र एक वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी झाली. ती आठ महिन्याची असताना तिचा पाडण्यातच मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे निकिता खचली होती. निकिता मानसिक अस्वस्थ असल्याने कदाचित तिने असे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here