समृद्धी हायवेवर भीषण अपघात, चौघे गंभीर जखमी

By : Ajay Gayakwad

वाशिम

समृद्धी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात चौघे गंभीर जखमी झालेत. 24 डिसेंबरला कारंजा जवळ MH28V 8234 या कारने  ट्रकला मागून धडक दिल्याने कार मधील चार जण गंभीर जखमी झाले. जखमी हे चिखली येथील असून त्यांची नावे भगतसिह परिहार वय 60, महानंदा सुरडकर वय 40, पूनम सुरडकर 20,  कारचालक भगवत खरात वय 58 अशी आहेत. अपघाताची माहिती ही विद्याभारती कॉलेजचे प्राध्यापक अतुल बरडे यांनी तात्काळ दिली.
अपघाताची माहिती मिळतात 108 लोकेशन समृद्धी हायवे टोल प्लाजा कारंजा डॉ बी एस राठोड व पायलट नरेंद्र बारसे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना काटोले हॉस्पिटल येथे आणले.डॉ पंकज काटोले यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले. त्यावेळी मदतीला प्रा. राजगुरे आणि संपूर्ण टीम प्रामुख्याने हॉस्पिटल येथे हजर होती. त्यावेळी श्रीगुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी यांच्या रुग्णवाहिका द्वारे त्यांना अकोला येथे पाठवण्यात आले पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here