२६ डिसेंबरला वरोऱ्यात हृदयरोग व सर्व रोग निदान व उपचार शिबिर*

 

लोकदर्शन👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था ( अभिमत विद्यापीठ) द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सांवगी (मेघे) आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंती निमित्त आरोग्य संकल्प अभियान अंतर्गत सोमवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वरोरा येथील साई मंगल कार्यालयात राज्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य हृदय रोग आणि सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पुरुषोत्तम सातपुते, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, आनंदवन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, मनसेचे नेते रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष करण संजय देवतळे उपस्थित राहणार आहेत.
श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत ट्रस्टच्या वतीने विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले असून यापूर्वी ३ आरोग्य शिबिराचे सफल आयोजन करण्यात आले. त्यात वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास ५ हजार नागरिकांनी लाभ घेतला तर पुढील उपचारासाठी ४०० रुग्णांची सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आगामी शिबिरात हृदय रोग आणि सर्व रोग निदान व उपचार करण्यात येणार असून तद्नंतर तपासणी केलेल्या रुग्णांची आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात अगदी स्वस्त दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच शिबिरात रोग निदान झालेल्या गरिब व गरजू रुग्णांचा ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचार स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संपूर्ण मदत केल्या जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) चे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे, ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले, दत्ता बोरेकर, हेमराज कुरेकर, विठ्ठल टाले ,सचिन चुटे, युवराज इंगळे, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, वरोरा व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *