By : Ajay Gayakwad
वाशिम
श्री क्षेत्र डव्हा ता मालेगाव जिल्हा वाशिम येथे विश्वनाथ महाराज यांचे शिष्य अर्जूनबाबा यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह विविध किर्तन व भजनाने साजरा केला व भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रारंभी अर्जूनबाबा यांच्या प्रतिमाची पालखीतुन टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभा यात्रा डव्हा गावातून काढण्यात आली या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी गाडगे बाबांच्या वेशभूषा करून डव्हा गावातील चौकाचौकत स्वच्छता तर केलीच व व्यसनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रबोधन देखील केले. अंनिसचे दतराव वानखेडे व मेजर अशोकराव घुगे, प्रा अनिल बळी यांनी व्यसन विरोधी अभियान जनजागृतीचे फलक हातात घेऊन रॅली मध्ये सहभागी झाले होते. महाप्रसादाच्या ठिकाणी आधुनिक गाडगे बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झालेले सामाजिक कार्यकर्ते पी एस खंदारे गाडगे बाबांच्या वेशभूषा करून पंचक्रोशीतील जमलेल्या हजारो महिला पुरूषासह ग्रामस्थांना *शुद्ध बिजापोटी फळे,रसाळ गोमटी* या अभंगावरती किर्तण केले पी एस खंदारे यांनी आपल्या किर्तनात संत महापुरूषांचे विचारांची परंपरा व विविध दाखले देत व्यसनापासून व अंधश्रद्धा पासून दुर राहण्यासाठी प्रबोधन केले तसेच शुन्य ते विस विद्यार्थ्यी पट संख्या असलेली सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय विरोधात वाशिम येथे आठ जानेवारी ला होत असलेल्या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले. महाप्रसादाच्या कार्यक्रमात अर्जूनबाबा संस्थानचे सर्व पदाधिकारी व सरपंच, पोलिस पाटील व मुंबई वरून आलेले कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. प्रकाश कापुरे यांनी केले व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रबोधन रॅली व शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री नाथ नंगे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनिल बळी, मेजर अशोकराव घुगे, श्री नाथ नंगे महाराज हेल्थ क्लबचे व्यवस्थापक अशोक सुर्वे, ग्रंथपाल भारती तिवारी, व्यायाम शाखेचे स्वयंसेवक व अर्जूनबाबा संस्थानने प्रयत्न केले.