ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकारिणी सदस्य पदी रमेश म्हात्रे

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 24 डिसेंबर 2022 उरण मधील सामाजिक कार्यकर्ते रमेश म्हात्रे यांचे कार्य व विचार पक्षनिष्ठा पाहून त्यांची नियुक्ती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीवादीने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार रमेश म्हात्रे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष तथा उपनेते अरुण जगताप यांच्या हस्ते रमेश म्हात्रे यांना अधिकृतरित्या नियुक्तीपत्र देण्यात आले.वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार व प्रसार करेन.व शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेउन कार्य करेन असे सांगत रमेश म्हात्रे यांनी सर्व वरिष्ट पदाधिका-यांचे आभार मानले. रमेश म्हात्रे यांची कार्यकारीणी सदस्यपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here