लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र चा या वर्षीचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार 2022 हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांना जाहीर झाला आहे. 25 डिसेंबर 2022 ला अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये डॉक्टर मोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . दरवर्षी राज्यातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटने द्वारा या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांनी अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जिवती व कोरपणा या तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ आरोग्य सेवेमध्ये महिलांच्या मासिक पाळी मध्ये जनजागृती कार्यक्रम राबविला आहे कापडी सॅनिटरी नॅपकिन प्रोजेक्ट द्वारा सॅनिटरी नॅपकिन वितरण व महिलांच्या आरोग्याबद्दल महिलांना जागृत करण्यात येते तसेच विविध आरोग्य शिबिर द्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत यामध्ये मोफत मोतीबिंदू शिबिर मोफत बालरोग शिबिर मोफत स्त्रीरोग शिबिर मोफत जनरल तपासणी शिबिर आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील कुपोषित बालकांना मोफत आरोग्य तपासणी करून पोषण आहार वाटप केलेले आहेत….. कोरोना काळात डॉ कुलभूषण मोरे यांनी अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्याकरिता हजारो कापडी मास्क मोफत वाटप केले होते तसेच कोरोना बद्दल जनजागृती कार्यक्रम ही राबविला होता.
डॉ कुलभूषण मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
,