By : Ajay Gayakwad
वाशिम
मालेगांव : 22 डिसेंबर
पैशाच्या लोभात माणूस बेभान होतो. अशावेळी त्याच्या हातून टोकाचे पाऊल उचलले जाते. प्रसंगी बहीणभावाचे रक्ताचे नातेही तो विसरू शकतो. वडिलांचे पैसे आपल्याला मिळावे म्हणून संतापलेल्या एका भावाने रागाच्या भरात बहिणीचे दात पाडले. ही घटना मालेगांव शहरातील जाट गल्लीत 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे.
मीनाक्षी संतोष झेंडे वय 42 वर्षे राहणार जाट गल्ली मालेगांव यांनी रूपेश भगवान दिपकवार राहणार शिक्षक कॉलोनी मालेगांव च्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता वडिलांचे पैसे व बॉण्ड माझ्या नावाने कर असे म्हणत फिर्यादीचा भाऊ रूपेश याने थापडा बुक्क्यांनी फिर्यादी च्या तोंडावर मारहाण करून फिर्यादीचे दात पाडले. फिर्यादीच्या मुलीने समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रूपेश ने तिला सुध्दा मारहाण करून शिवीगाळ केली, अशा फिर्यादीवरून व मेडीकल रिपोर्ट च्या आधारे मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 537 / 2022 नोंदवून भादंवि च्या 325, 323, 504 नुसार प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास कोकाटे करीत आहेत.