By : AJAY GAIKWAD
वाशीम
मालेगांव : – दि २१/१२/२०२२ रोजी शिरपुर जैन येथे जैन धर्माचे संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज व त्याचे शिष्य श्रमण मुनि निर्यापक १०८ योगसागरजी महाराज व ससंघ,श्रमण मुनी निर्यापक १०८ वीर सागरजी महाराज व ससंघ,परम प्रभावक मुनिश्री १०८ निस्पृहसागर जी महाराज व ससंघ,ऐलक श्री सिद्धांत सागर जी महाराज यांच्या सानिध्यात झाला आहे भव्य दिव्य शिलान्यास झाले व मुनी दिक्षा व क्षुल्लक दिक्षा समारंभ झाला यामध्ये आचार्य श्री विद्यासागर महाराज व त्याचे आणखी दोन भाऊ मुनि आहेत व त्याचे एक भाऊ हे घर संभाळत होते त्यांना असे वाटले की आपले तीन भाउ मोक्ष मार्ग चालले तर आपण ही मोक्ष मार्ग जावे म्हणून त्यानी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांचे कडून बाल ब्रम्हचारी भैय्या बनुन १३ प्रतिमा धारी चे पालन केले आहे त्यांना ही २१ तारखेला मुनी दिक्षा दिली व त्यांचे नामकरण झाले त्याचे नांव श्रमन मुनि श्री १०८ उत्कृष्टसागर महाराज असे म्हणून ओळखले जाणार आहे मुनि बनले चार भावाचे नांव संत शिरोमणी आचार्य श्री विघासागर महाराज,निर्यापक श्रमण मुनि १०८ समय सागर महाराज,निर्यापक श्रमन मुनि १०८ योग सागर महाराज व त्याचे दिक्षा घेणारे चौथे भाऊ श्रमन मुनि श्री १०८ उत्कृष्ट सागर महाराज यांना दि २१/१२/२०२२ रोजी मुनि दिक्षा दिली यांच्या सोबतच २१ ब्रम्हचारी भैय्या यांना क्षुल्लक दिक्षा दिल्या आहे निर्यापक श्रमन मुनि श्री १०८ योगसागर महाराज यांच्या संघा सोबत असलेले भैया आपल्या विदर्भातील वर्धा येथील एक ब्रम्हचारी भैया जयेश याना सुद्धा क्षुल्लक दिक्षा मिळाली आहे त्याचे नामकरण औचित्यसागर महाराज असे नाव दिले आहे आचार्य श्री सानिध्यात त्याचा संघा मध्ये दिक्षा दिल्या व शिरपुर मध्ये एकुण ५१ मुनि झाले आहेत व त्यांच्या आहार चे चौके ही भरपुर लागत आहेत व शिरपुर मध्ये चातुर्मास सारखी रौनक आली रोज हजारो भाविक दर्शनाला येत आहेत शिरपुर जैन येथे संस्थानने आई भवानी मंदिर समोर २२ एकर शेती घेतलेली आहे या मध्ये त्रि मंजिला समवशरण मंदिर उंची २२७ फुट व सहस्त्रकुट जिनालय एक सहस्त्रकुट जिनालय यांची उंची १२७ फुट असे चार होतील यांचा शिलान्यास दिनांक २१/१२/२०२२ रोजी बुधवार ला सकाळी ७.३० वाजता झाला आहे तर दुपारी २ वाजता मुनि दिक्षा व क्षुल्लक जी दिक्षा देवून शिरपुर जैन येथे शिरपुर जैन,मालेगांव,वाशिम,अकोला,पुसद,अनसिग,डोणगांव,परभणी,हिंगोली,म.पी,गुजरात,कर्नाटक हजारो व लाखो जैन बांधवानी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.