,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉,,(प्रा अशोक डोईफोडे,)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था ऊपरवाही येथे दिनांक 15 डिसेंबरला नाबार्ड पुरस्कृत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत वेल्डर आणि पीसीबी या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री कुणाल फुलजले, संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर श्री श्रीकांत कुंभारे, संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद खळसे, श्री नरेश सुबे व बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक श्री दीपक रतने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात ज्यांचे पाल्य हे दूर अंतरावरती नोकरी किंवा व्यवसाय करीत आहे अशा पालकांचा सत्कार करण्यात आला. अल्प कालावधीचे कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योगासाठी तयार होत असलेले युवक आणि युवती हे समाजाला प्रेरणा देणारे आहेत. अशा या स्तुत्य उपक्रमाकरिता संस्थेची आणि उपस्थितांची प्रशंशा नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केली. प्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद खडसे सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्दिष्टे आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून स्पष्ट केली व अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम व उद्योगक्षम बनविण्याचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रशिक्षणार्थी व पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाची महत्त्व सांगून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे संचालन श्री प्रफुल बोरकुटे यांनी केले कार्यक्रमाला उपस्थितांची व्यवस्था रवींद्र मरावी यांनी केली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तोडे श्री बेलोरकर कर प्रतीक आवडे श्रीनिवास पोतरला श्री विश्वास श्री सुजित मूडपल्लीवार, तेजराज हेपटे, पवन थिपे, सौ प्रियंका बल्की प्रांजू गोरकार श्री पुणेकर अमित चौधरी व सर्व विद्यार्थी मित्र व अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले